मंगरूळ ग्रामपंचायतीत निधी वापराबाबत प्रश्नचिन्ह; ग्रामस्थांचा चौकशीचा आग्रह

वित्त आयोगाच्या निधीतील अनियमिततेचा आरोप, अन्यथा 20 एप्रिल पासून आंदोलन करण्याचा इशारा

हिमायतनगर, अनिल मादसवार | तालुक्यातील मंगरूळ ग्रामपंचायतीत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीच्या वापराबाबत गंभीर शंका व्यक्त होत असून, ग्रामस्थांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. निधीच्या खर्चात पारदर्शकता नसल्याचा आरोप करत ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. वित्त आयोगाच्या निधीतील अनियमिततेची सखोल चौकशी करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा गंगाधर पांडलवाड यांनी दिला आहे.

ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाच्या म्हणण्यानुसार, मंगरूळ ग्रामपंचायतीकडून विविध विकासकामांसाठी खर्च झाल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात अनेक कामे अपूर्ण किंवा निकृष्ट दर्जाची असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी खर्चाच्या तुलनेत कामांची गुणवत्ता अत्यंत कमी असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी जिल्हा परिषद , पंचायत समिती तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

ग्रामस्थांचा आरोप आहे की, ग्रामपंचायत प्रशासनातील काही पदाधिकाऱ्यांनी संगनमताने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत 7 लक्ष 40 हजार 5 रुपयाच्या निधी खर्च केल्याचे ऑनलाईन पोर्टलवर दाखविले आहे. त्यातून एक लाख 34 हजार रुपयांच्या खुर्च्या खरेदी केल्याचे दाखविले मात्र गावांमध्ये अद्याप खुर्च्या आल्याच नाहीत. त्यावरून निलंबित ग्रामसेवक खिलारे यांनी परस्पर हा निधी उचलून घेतला आहे. त्यामुळे मंगरूळ ग्रामपंचायत मोठ्या प्रमाणात अपार झाल्याची शंका निर्माण झाली आहे.

त्यामुळे आतापर्यंत मंगरूळ ग्रामपंचायतच्या विकास कामाच्या नावाखाली बनावट स्वाक्षरी करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचे दिसून येत आहे. याची चौकशी करूनकिती भ्रष्टाचार झाला… कोण कोणती कामे झाली. याची चौकशी करून शासनाच्या निधीचा अपव्यय केल्याचे उघड करावे. तसेच खर्चाच्या नोंदी व प्रत्यक्ष कामांमध्ये तफावत दिसत असल्याने मंगरूळ गावकऱ्यांच्या नावाखाली होणारी नोट थांबवावी.

संबंधित ग्रामसेवकाची काळात झालेल्या कामाची प्रशासनाकडून योग्य ती चौकशी करावी. आणि शासनाच्या निधीच्या अपार झाल्या प्रकरणी कारवाई न झाल्यास येणाऱ्या 20 एप्रिल पासून गावातील नागरिकांना घेऊन पंचायत समिती कार्यालय समोर आभार उपोषणाला बसत आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गंगाधर पांडलवाड यांनी दिला आहे. “निधीचा योग्य वापर होऊन गावाचा विकास व्हावा, हीच आमची अपेक्षा आहे,” असे निवेदनात स्पष्ट केले आहे.

Oplus_16908288

या तक्रारीमुळे हिमायतनगर तालुक्यात व मंगरूळ परिसरात चर्चेला उधाण आले असून, आता प्रशासन यावर काय..? भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवेदनाच्या प्रती खासदार, आमदार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड, उपविभागीय अधिकारी हदगांव, तहसीलदार हिमायतनगर तसेच गटविकास अधिकारी हिमायतनगर व पत्रकार बांधवाना देण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top