क्राइम

नांदेड परिक्षेत्रात गुटखा विरोधी धडक मोहीम

८१ आरोपी गजाआड, १.१९ कोटींचा मुद्देमाल जप्त

नांदेड | नांदेड परिक्षेत्रात गुटखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांना मोठे यश मिळाले असून, अवघ्या १५ दिवसांत ८१ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच ७१ गुन्हे दाखल करून तब्बल १ कोटी १९ लाख ९५ हजार ५३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली १६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत ही व्यापक मोहीम राबविण्यात आली. कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने गुटखा विक्री, साठवणूक आणि वाहतुकीविरोधात कडक कारवाई करण्यात आली.

जिल्हानिहाय कारवाई :
नांदेड : २८ गुन्हे, ३१ आरोपी अटक, ₹३१.७० लाखांचा मुद्देमाल
परभणी : १३ गुन्हे, १८ आरोपी अटक, ₹९.२० लाखांचा मुद्देमाल
हिंगोली : ११ गुन्हे, ७ आरोपी अटक, ₹८.५७ लाखांचा मुद्देमाल
लातूर : १९ गुन्हे, २५ आरोपी अटक, ₹७०.४७ लाखांचा मुद्देमाल
एकूण ३०४२ दुकाने व पानटपऱ्यांची तपासणी करत पोलिसांनी ही मोहीम तीव्र केली होती.

या कारवाईदरम्यान गुटखा, पान मसाला, खर्रा, मावा तसेच सुगंधित तंबाखू यांसारख्या प्रतिबंधित पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. संबंधित आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, या गुन्ह्यांना १० वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे.

‘खबर’ हेल्पलाइनचा मोठा उपयोग
या मोहिमेत नागरिकांचाही मोठा सहभाग दिसून आला. पोलीसांनी सुरू केलेल्या ‘खबर’ हेल्पलाइनवर मिळालेल्या माहितीच्या आधारे विशेष पथकाने गंगाखेड (परभणी), वाढवणा (लातूर) आणि इतवारा (नांदेड) येथे छापे टाकून १३.४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, या यशस्वी मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला असून, गुटखा निर्मूलनासाठी अशा धडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

ALM Network

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!