नांदेड विभागात तिकीट तपासणी मोहीम; ९५४ अनियमित प्रवासी आढळले

रेल्वे प्रशासनाकडून ५.९९ लाखांचा दंड वसूल
नांदेड| दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात प्रवाशांमध्ये नियमांचे पालन वाढवण्यासाठी आणि तिकीटविना प्रवासाला आळा घालण्यासाठी विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण ९५४ अनियमित प्रवासाची प्रकरणे आढळून आली असून ५ लाख ९९ हजार १४० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

या कारवाईत तिकीटविना प्रवास करणाऱ्यांची ६८१ प्रकरणे समोर आली असून त्यांच्याकडून ४ लाख ७९ हजार २०५ रुपये वसूल करण्यात आले. तसेच अनियमित प्रवासाच्या १७७ प्रकरणांमध्ये १ लाख ५ हजार १८५ रुपयांचा दंड आकारण्यात आला. याशिवाय नोंद न केलेल्या सामानाची ९६ प्रकरणेही आढळून आली.

या विशेष मोहिमेत एकूण १६८ रेल्वे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यात २७ तिकीट तपासणी पथक सदस्य, १२९ वाणिज्य व प्रवासी सुविधा विभागातील कर्मचारी आणि १२ स्थानक कर्मचाऱ्यांचा समावेश होता. विभागातील विविध स्थानके आणि गाड्यांमध्ये ही तपासणी करण्यात आली.

Oplus_16908288

रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारच्या मोहिमा नियमितपणे राबविण्यात येत असून, प्रवाशांनी दंड व गैरसोय टाळण्यासाठी वैध तिकीटासहच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top