नांदेड| हैदराबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा गुरुवारी People’s College Nanded येथे उत्साहात सत्कार करण्यात आला.


नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणी मंडळाची निवड नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत एकमताने करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी सीए डॉ. प्रवीण पाटील, उपाध्यक्षपदी अॅड. प्रफुल अग्रवाल, सचिवपदी प्रा. सौ. शामल पत्की तसेच सहसचिवपदी अॅड. प्रदीप नागपूरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


नवीन पदाधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात पीपल्स महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा. दत्ता भगत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी नूतन अध्यक्ष डॉ. प्रवीण पाटील, उपाध्यक्ष अॅड. प्रफुल अग्रवाल आणि सहसचिव अॅड. प्रदीप नागपूरकर यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला सोसायटीचे कार्यकारिणी सदस्य चिरंजीलाल दागडीया, नौनिहालसिंग जहागीरदार, प्रा. यशपाल भिंगे, प्रा. विलास वडजे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. शिवशंकर भानेगावकर यांनी केले.

सत्काराला उत्तर देताना अध्यक्ष डॉ. प्रवीण पाटील, उपाध्यक्ष अॅड. प्रफुल अग्रवाल व सहसचिव अॅड. प्रदीप नागपूरकर यांनी मनोगत व्यक्त करत सोसायटीच्या शैक्षणिक प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचा विश्वास व्यक्त केला. प्रा. यशपाल भिंगे यांनीही आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मुकुंद कवडे यांनी केले, तर आभारप्रदर्शन अधीक्षक रोहिदास आडे यांनी केले. या कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




