Friday, April 10, 2026
No menu items!
Google search engine
Homeसामाजिकदुष्काळी फाट्यावर रस्ता खचला; विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात, प्रशासनाला तात्काळ दुरुस्तीची मागणी

दुष्काळी फाट्यावर रस्ता खचला; विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात, प्रशासनाला तात्काळ दुरुस्तीची मागणी

सीडी वर्कमधील पाईपला भगदाड; एसटी सेवा बंद, परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांची गैरसोय

हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) सिरंजनी–हिमायतनगर या महत्त्वाच्या मार्गावरील दुष्काळी फाटा येथे सीडी वर्कमधील सिमेंट पाईपला मोठे छिद्र पडल्याने रस्ता खचून पूर्णपणे बंद झाला आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, एसटी बस सेवा देखील बंद करण्यात आली आहे. यामुळे विशेषतः शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.

सध्या परीक्षा सुरू असताना वाहतूक बंद झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला पोहोचणे कठीण झाले असून काहींना परीक्षा चुकवावी लागत आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

यापूर्वी अशा परिस्थितीत ग्रामस्थांनी श्रमदानातून दोन वेळा रस्ता सुरू केला होता. मात्र सध्या शेतीच्या हंगामामुळे शेतकरी कामात व्यस्त असल्याने यावेळी स्थानिक पातळीवर दुरुस्ती करणे शक्य नसल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, ग्रामपंचायत सिरंजनीच्या सरपंच मेघा पवन करेवाड यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत या गंभीर समस्येकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी केली आहे. संबंधित विभागाला आदेश देऊन सीडी वर्कची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी तसेच बंद असलेली एसटी सेवा त्वरित सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ही समस्या सार्वजनिक हिताची आणि अत्यंत तातडीची असल्याने प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अन्यथा ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन छेडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ALM Networkhttp://almbharat.com
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!