धर्म अध्यात्म

श्रीक्षेत्र गंगणबीड येथे पालखी उत्सव, शिव-पार्वती विवाहसोहळा व चैत्र यात्रा उत्साहात

नायगाव| तालुक्यातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र गंगणबीड येथे आंबली-बारसी निमित्त पालखी उत्सव, शिव-पार्वती विवाहसोहळा व चैत्र यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. २९ मार्च ते मंगळवार दि. ३१ मार्च २०२६ या कालावधीत हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती देवस्थान समितीतर्फे देण्यात आली.

प्राचीन व जाज्वल्य परंपरा लाभलेल्या श्रीक्षेत्र गंगणबीड देवस्थानावर शिखर शिंगणापूरनंतर भाविकांची मोठी श्रद्धा असून दरवर्षी येथे मोठ्या उत्साहात यात्रा भरते.

कार्यक्रमाचे स्वरूप पुढीलप्रमाणे :
रविवार दि. २९ मार्च : सायंकाळी ५ वाजता देवस्थानचे मुख्य पुजारी भागवत अप्पा स्वामी यांच्या निवासस्थानी शिव-पार्वतीची विधिवत महाभिषेक व आरती होईल. त्यानंतर बँड-बाजा, हलगी-सनई व भजनी मंडळींच्या गजरात पालखी गावातील मुख्य मार्गाने सायंकाळी ८ वाजता हनुमान मंदिरात पोहोचेल.

तेथेही महाभिषेक-आरती पार पडेल. रात्री ९ वाजता पालखी श्री महादेव मंदिरात आगमन करून महारुद्राभिषेकानंतर रात्री ९.३० वाजता शिव-पार्वतीचा शुभविवाह संपन्न होईल. यानंतर आरती व आकर्षक फटाक्यांची आतषबाजी होणार आहे.

सोमवार दि. ३० मार्च : सकाळी ८ वाजता द्वादशी-बारसी निमित्त गावकऱ्यांतर्फे चैत्र-आंबलीचा भव्य महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. दिवसभर परिसरातील भाविक काठी-कावडी घेऊन दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

मंगळवार दि. ३१ मार्च : सकाळी ९ वाजता मंदिरात शिव-पार्वती पूजनानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात पालखी गावाकडे प्रस्थान करेल. हनुमान मंदिर मार्गे मुख्य पुजारी अप्पा स्वामी यांच्या निवासस्थानी आरती व पूजेनंतर महोत्सवाची सांगता होईल.

या भव्य धार्मिक सोहळ्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन श्रीक्षेत्र गंगणबीड ग्रामस्थ मंडळी व मंदिर देवस्थान समितीतर्फे करण्यात आले आहे.

ALM Network

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!