मनोरंजनसामाजिक

श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या सुशोभीकरणाची मागणी

देगलूर | देगलूर शहरातील एकमेव सार्वजनिक उद्यान असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान च्या सुशोभीकरणासाठी सामाजिक कार्यकर्ते धनाजी जोशी यांनी पुढाकार घेत नगर परिषद प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे.

देगलूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निलम कांबळे यांची भेट घेऊन त्यांनी उद्यानाचे नूतनीकरण करण्याची मागणी केली. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी तसेच कुटुंबीयांना फिरण्यासाठी शहरात पर्यायी जागा नसल्यामुळे या उद्यानाचे महत्त्व अधिक वाढले आहे. त्यामुळे नव्याने टेंडर काढून मुलांसाठी खेळण्यांची आधुनिक साधने उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली.

याबाबत मुख्याधिकारी निलम कांबळे यांनी सकारात्मक भूमिका घेत हा विषय नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चेला घेण्याचे आश्वासन दिले असून संबंधित विभागाला आवश्यक सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, शहरातील मुलांमध्येही या उद्यानाबाबत मोठी उत्सुकता आहे. “आम्हाला शिवाजी पार्कला कधी नेणार?” असा निरागस सवाल अनेक लहान मुले आपल्या आजी-आजोबांना करत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. उन्हाळी सुट्टीत खेळण्यासाठी योग्य सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा बालकांसह पालकांमध्ये व्यक्त होत आहे.

शहरातील या एकमेव उद्यानाचे सुशोभीकरण करून ते सुरळीतपणे सुरू ठेवावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत असून, आता नगर परिषद प्रशासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ALM Network

या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!