Friday, April 10, 2026
No menu items!
Google search engine
Homeमहाराष्ट्रगोदावरी नदी पुनरुज्जीवनासाठी नांदेड जिल्हा प्रशासनासोबत सामंजस्य करार

गोदावरी नदी पुनरुज्जीवनासाठी नांदेड जिल्हा प्रशासनासोबत सामंजस्य करार

नांदेड| गोदावरी नदी खोऱ्याच्या पुनरुज्जीवनासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलत डियाजियो इंडिया आणि नांदेड जिल्हा प्रशासन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे शाश्वत जलसंपदा व्यवस्थापन आणि पर्यावरणीय संतुलन साधण्यास मोठी मदत होणार आहे.

हा करार नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि डियाजियो इंडिया (नांदेड) चे मॅच्युरेशन अँड डिस्टिलेशन विभागाचे महाव्यवस्थापक प्रकाश वामनराव बोडाडे यांच्या उपस्थितीत पार पडला.

या भागीदारीअंतर्गत डियाजियो इंडिया कडून पाणी पुनर्भरण (Water Recharge) तसेच WASH (पाणी, स्वच्छता आणि स्वच्छतेच्या सवयी) यांसंबंधित विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. तर जिल्हाधिकारी कार्यालय जलस्रोतांची निवड, शासकीय योजनांशी समन्वय आणि उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले, “गोदावरी नदी चे पुनरुज्जीवन हे केवळ पर्यावरणीय नव्हे तर लोकांच्या उपजीविका आणि शेतीसाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे. या उपक्रमामुळे भूजल पातळी सुधारेल आणि शेतकऱ्यांना अधिक विश्वासार्ह सिंचन सुविधा उपलब्ध होतील. शासनाच्या विविध योजनांचा समन्वय आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग यामुळे हा उपक्रम अधिक प्रभावी ठरेल.”

दरम्यान, डियाजियो इंडिया चे कॉर्पोरेट रिलेशन्स डायरेक्टर देवाशीष दासगुप्ता यांनीही या उपक्रमाबाबत सकारात्मक भूमिका मांडत, पर्यावरण संवर्धनासाठी उद्योग आणि प्रशासन यांच्यातील सहकार्य महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. या सामंजस्य करारामुळे नांदेड जिल्ह्यात जलसंपदा व्यवस्थापनाला नवी दिशा मिळणार असून, पर्यावरणपूरक विकासासाठी हा उपक्रम मार्गदर्शक ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

ALM Networkhttp://almbharat.com
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!