Friday, April 10, 2026
No menu items!
Google search engine
Homeक्राइमअवैध पिस्टल व खंजरांसह दोन जण ताब्यात, 1.35 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध पिस्टल व खंजरांसह दोन जण ताब्यात, 1.35 लाखांचा मुद्देमाल जप्त

स्ट्रिट सेफ्टी पथकाची धडक कारवाई

नांदेड| शहरात अवैध हत्यारे बाळगून फिरणाऱ्या दोन इसमांना विमानतळ पोलिसांनी स्ट्रिट सेफ्टी पथकाच्या मदतीने ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. आरोपींकडून पिस्टल, खंजर, दुचाकी व मोबाईल असा एकूण 1 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई 8 एप्रिल रोजी कोम्बिंग ऑपरेशन व गस्तीदरम्यान करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दोन इसम अवैध हत्यारे बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने मातागुजरी चौक परिसरात सापळा रचला. संशयितांना अडवून झडती घेतली असता त्यांच्याकडून एक लोखंडी पिस्टल, दोन खंजर, एक मोबाईल फोन व एक पल्सर मोटारसायकल आढळून आली.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे खुशालसिंग नानकसिंग गिल (वय 22, संभाजीनगर/नांदेड) व जयमितसिंग बलविरसिंग साहू (वय 22, हिंगोली/नांदेड) अशी आहेत. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. 129/2026 अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 4/25 अंतर्गत 9 एप्रिल 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अविनाश कुमार, अर्चना पाटील व सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्ट्रिट सेफ्टी पथक प्रमुख पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या नेतृत्वात पार पडली. दरम्यान, या धडक कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी संबंधित पथकाचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.

ALM Networkhttp://almbharat.com
या पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. ALMNetwork जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!